Maharashtra Board 12th Supplementary Results 2019 Declared: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा ( Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) पुरवणी परीक्षा 12 वीचा (HSC) निकाल आज (23 ऑगस्ट) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाला आहे. महाराष्ट्रामध्ये जुलै 2019 मध्ये या परीक्षा पार पडल्या. आज mahresult.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येणार आहे.
यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12 वीच्या पुरवणी परीक्षांना सुमारे लाखभर विद्यार्थी सामोरे गेले होते. 3 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रामध्ये या 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा पार पडली. इयत्ता बारावीची परीक्षा आता केवळ 600 गुणांची; शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची माहिती
कसा पहाल 12 वी पुरवणी परीक्षांचा निकाल?
# महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
# Maharashtra HSC Supplementary result 2019 या लिंकवर क्लिक करा.
# रिल्झट लॉग इन पेज ओपन होईल.
# त्यानंतर हॉल तिकीट नंबर, जन्मतारीख, आईचे नाव आणि इतर महत्त्वाची माहिती भरुन समिट बटणावर क्लिक करा.
# Maharashtra HSC Supplementary result 2019 निकाल पुढील पेजवर दिसेल.
# तसंच तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता किंवा निकालची प्रत सेव्ह करु शकता.
महाराष्ट्र राज्य पुरवणी परीक्षा10 वीचा निकाल देखील लवकरच लागणार आहे. अद्याप मंडळाकडून या निकालाच्या तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र पुढील आठवडाभरात दहावीचा निकालदेखील जाहीर केला जाणार आहे.