निकाल । File Image

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) सन 2024 च्या इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याच्या तयारीत आहे. नजिकच्या काहीच काळात हे निकाल जाहीर होतील. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियांवरुन केला जाणारा दावा विचारात घेतला तर, दोन्ही इयत्तांसाठी झालेल्या बोर्ड परीक्षांचे निकाल येत्या काही दिवसांत जाहीर होतील. दरम्यान, शिक्षण मंडळाकडून मात्र, दोन्ही इयत्तांच्या निकालाजी तारीख आणि त्याबाबतचा कोणताही तपशील आतापर्यंत जाहीर झाला नाही. तसेच, त्यााबत कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती दिली नाही. एमएसबीएसएचएसई एसएससी परीक्षा  निकालाबाबत घ्या अधिक जाणून.

निकाल ऑनलाईन उपलब्ध

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा हा निकाल जाहीर झाल्यानतंर लगेचच तो MSBSHSE त्यांच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर उपलब्ध करुन दिला जाईल. ज्यामुळे विद्यार्थ्यी, पालक आणि शिक्षकवृंदांना हा निकाल तातडीने मिळवता येईल. निकाल ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यासाठी आणि पाहण्यासाठी शिक्षण मंडळाने अधिकृतरित्या दो संकेतस्थळे उपलब्ध करुन दिली आहेत. त्यापैकी एक आहे mahresult.nic.in आणि दुसरे म्हणजे mahahsscboard.in. या दोन्ही संकेतस्थळांवर हे निकाल उपलब्ध असतील. (हेही वाचा, MSBSHSE SSC, HSC Result 2024: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ 11 मे दिवशी जाहीर करणार बोर्डाचा निकाल? जाणून घ्या कसे, कुठे पाहू शकाल तुमचे मार्क्स)

महाराष्ट्र एचएससी, एसएससी बोर्ड परीक्षा 2024 चे निकाल कसे तपासायचे?

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10वी आणि 12वी निकाल 2024 मध्ये प्रवेश करण्यासाठी, या चरणांचे अनुसरण करा:

1. mahresult.nic.in वर अधिकृत MAH निकाल वेबसाइटला भेट द्या.

2. मुख्यपृष्ठावर महाराष्ट्र SSC आणि HSC निकाल 2024 च्या लिंक पहा.

3. तुमची लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि सबमिट करा क्लिक करा.

4. तुमच्या निकालात प्रवेश करा आणि पृष्ठ डाउनलोड करा.

5. भविष्यातील संदर्भासाठी, डाउनलोड केलेल्या निकालाची प्रत प्रिंट करा.

महाराष्ट्र बोर्डाच्या एचएससी परीक्षेत 15 लाखांहून अधिक परीक्षार्थी

महाराष्ट्र बोर्डाच्या MSBSHSE परीक्षा फेब्रुवारी ते मार्च 2024 या कालावधीत घेण्यात आल्या. SSC इयत्ता 10वीच्या परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत झाल्या, तर HSC इयत्ता 12वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आल्या. यावर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या एचएससी परीक्षेत 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी आणि महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी परीक्षेत 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतल्यासह लक्षणीय संख्येने सहभागी झाले आहेत.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आजही मोठे महत्त्व दिले जाते. इयत्ता दहवीनंतर अनेक छोटे छोटे कोर्स उपलब्ध असतात. शिवाय भविष्यातील शिक्षणासाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान यांसारखे विभागही निवडता येतात. इयत्ता बारावी परीक्षेनंतरही व्यावासायिक शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होत असतात.