अनेक अत्यावश्यक सोयीसुविधांची कमतरता असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील महत्त्वपुर्ण अशा 19 रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळाने घेतला आहे. यासाठी सल्लागार नेमण्याकरिता निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या स्थानकांमध्ये घाटकोपर, मुलुंड, भांडुप, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ, कसारा, जीटीबी नगर, गोवंडी, मानखुर्द, मुंबई सेन्ट्रल, जोगेश्वरी, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई रोड, नालासोपारा, विरार या स्थानकांचा समावेश आहे.
मुंबई, ठाण्यातील महत्त्वाची अशी समजल्या जाणा-या ह्या 19 रेल्वेस्टेशनांवर नेहमीच गर्दी पाहायला मिळते. गाड्या उशिराने धावत असल्या की किंवा मेगाब्लॉक असला की ह्या रेल्वेस्टेशनांवर खूपच गोंधळ उडतो. अशावेळी प्रसाधनगृहांची दूरावस्था, प्रवाशांना सोयीस्कर अशी आसनव्यवस्था नसल्याने प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांना आवश्यक अशा सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी घाटकोपर, मुलुंड, भांडुप, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ, कसारा, जीटीबी नगर, गोवंडी, मानखुर्द, मुंबई सेन्ट्रल, जोगेश्वरी, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई रोड, नालासोपारा, विरार ह्या रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मध्य रेल्वे विकास महामंडळाने घेतला आहे. ह्यात सरकते जिने, लिफ्टची सुविधा यांसारख्या आधुनिक सोयीसुविधांचाही समावेश असेल.
एमयूटीपी-३ ए अंतर्गत हा पुनर्विकास केला जाणार असून नुकतीच केंद्र सरकारकडूनही त्याला मंजुरी मिळाली आहे. प्रवाशांच्या गरजा पाहता स्थानकातील सुविधा देणारा प्रकल्प प्रथम करण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीतील आचारसंहितेमुळे हे काम थांबले होते. मात्र आता लवकरच हे काम युद्धपातळीवर सुरु केले जाणार आहे.
मुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस !
रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम 2 ते 3 वर्षांत पुर्ण होईल. पुनर्विकासाच्या ह्या कामात आधुनिक सोयीसुविधांबरोबर इतरच महत्त्वाचे असे बदल ह्या रेल्वेस्थानकांत करण्यात येणार आहे.