MPSC logo (Photo Credits: Website)

पुण्यात (Pune) एमपीएससीची (MPSC Examination) तयारी करणारे शेकडो विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले असुन या विद्यार्थ्यांनी परिक्षेच्या नव्या नियमाबाबत आणि पॅटर्न (MPSC Pattern) बाबत राज्य सरकारकडे (Maharashtra Government) मागणी केली आहे. राज्याच्या विविध भागातील विद्यार्थी पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी येतात. वर्षानुवर्ष मेहनत, अभ्यास करुन ते जिद्दी आणि चिकाटीच्या जोरावर एमपीएससी देतात. पण गेल्या दोन वर्षापूर्वी कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांची परिक्षा पुढे ढकल्या गेली, क्लासेस नीट झाले नाही, मानसिक किंवा शारिरीक अडचणींमुळे अभ्यास नीट झाला नाही, पण अशा विविध संकटातून मार्ग काढून विद्यार्थी पुन्हा एकदा आता कुठे जोमाने अभ्यासाला लागले आहेत. त्यात आता राज्य सरकार एमपीएससी परिक्षेचे नियम किंवा पॅटर्न बदलण्याच्या विचारात आहे. तरी सरकारच्या या निर्णयावर आक्रमक होत एमपीएससीच्या विद्यार्थी आज पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत.

 

तरी राज्य सरकारने किमान २०२५ पर्यत एमपीएससीच्या परिक्षेच्या नियमात किंवा परिक्षा पध्दतीमध्ये कुठलेही बदल करु नये अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. असे केल्यास लांब काळापासून परिक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होईल. पुन्हा नव्या अभ्यासक्रमाचा नव्याने अभ्यास करणं शक्य नाही तसेच त्यात मोठा कालावधी वाया जाईल असे विद्यार्थ्यांचे मत आहे. (हे ही वाचा;-Government Job: आता सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एमपीएससी पास करण्याची गरज नाही, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा)

 

कोरोना महामारी दरम्यान आधीचं विद्यार्थ्यांचे दोन वर्ष वाया गेले आहेत. त्यात परिक्षा पास करण्याची वयोमर्यादा आता जवळ येवून ठेपली असताना परिक्षा पध्दती बदलल्यास विद्यार्थ्यांचं मोठ नुकसान होईल असं एमपीएससी विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.  पुण्यातील नवी पेठेतील अहिल्या शिक्षण संस्थेसमोर शेकडो विद्यार्थी विविध मागण्यांसाठी रत्यावर उतरले आहेत. विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी केली जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलन स्थळी दाखल करण्यात आला आहे.