MPSC Exam 2020: एमपीएससी परिक्षांबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली नाराजी
Chandrakant Patil And Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Goverment) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा (MPSC) पुढे ढकलण्याचा निर्णय शुक्रवारी सायंकाळी जाहीर केला आहे. यातच भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकार हे दिशाहीन आहे. एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागणार होत्या. याबाबत अगोदरच निर्णय करायला हवा होता. तसेच 11 ऑक्टोबर तारखेला परीक्षा असताना राज्य सरकार चक्क 9 तारखेला निर्णय घेत आहेत, हे काही बरोबर नाही,असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट कायम आहे. एमपीएससीच्या परिक्षेला बसलेले काहीजणांना कोरोनाचे संसर्ग झाला आहे. तसेच या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागणार होत्या. याबाबत अगोदर निर्णय घ्यायला हवा होता. कोणीही निर्णयाची जबाबदारी घ्यायला तयार होत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तर मातोश्रीतच बसले आहेत. परिणामी, ही वेळ येते की, अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी बाहेर पडले आहेत. मला मान्य आहे की, मराठा समाजाचे तरूण-तरूणी खूप अस्वस्थ आहेत. त्यांना त्यांच्या भवितव्याबाबत चिंता आहे. त्यांच्याकडून जो विरोध झाला, हा विरोध जर मान्य असेल, तर सरकारने वेळेत या परीक्षा पुढे ढकलायला हव्या होत्या. राज्य सरकार हे दिशाहीन आहे. 11 तारखेला परीक्षा असताना तुम्ही 9 तारखेला निर्णय घेत आहात, हे काही बरोबर नाही.” असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Ramdas Athawale Criticizes Shiv Sena: 'शिवसेना मराठी भाषेचे राजकारण करत आहे' शोभा देशपांडे यांच्या भुमिकेला रामदास आठवले यांचा विरोध

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. परिणामी, 5 एप्रिल 2020 रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. मार्च महिन्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती विचारात घेऊन परीक्षा आधी 13 सप्टेंबरला होणार होती, मात्र त्याच दिवशी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलून 20 सप्टेंबरला घेण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, राज्यात कोरोनाचे संकट कायम असून 11 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.