MPSC 2020 Exam Revised Dates: राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 यंदा 14 मार्च ला; इथे पहा संपूर्ण वेळापत्रक
MPSC Exam | Image used for Representational Purpose | (Photo Credits: Pixabay.Com)

महाराष्ट्रामध्ये यंदा सुरूवातीला कोविड 19 संकट आणि नंतर मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थगितीवरून राज्यात एमपीएससी परीक्षा 2020 सातत्याने लांबणीवर पडल्या होत्या. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 (MPSC Prelims) ची नवी तारीख 14 मार्च 2021 अशी जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० ही परीक्षा 27 मार्च तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० आता 11 एप्रिल 2021 दिवशी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच पुढील अपडेट्ससाठी परिक्षार्थ्यांनी mpsc.gov.in ला वेळोवेळी भेट देण्याचं आवाहन केले आहे.

राज्य सरकारने यापूर्वी 10 ऑक्टोबरला परिपत्रक काढून 11 ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलत असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता ही 11 ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलून 14 मार्च 2021 ला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकामध्ये परीक्षार्थ्यांनी कोविड 19 नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन केले आहे. इथे पहा अधिकृत परिपत्रक.

ट्विट पहा 

दरम्यान वारंवार परीक्षा पुढे ढकलल्या जात असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. मुलांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. वयोमर्यादेची अट असल्याने काहींची शेवटची संधी देखील हुकण्याची भीती वर्तवण्यात आली होती. त्यावरून काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने एक परिपत्रक काढून वयोमर्यादेची आणि किती वेळा परीक्षा दिली जाऊ शकते याची देखील माहिती दिली होती. MPSC Exam New Rule: स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांना संधीची कमाल मर्यादा निश्चित; जाणून घ्या कोणत्या वर्गासाठी किती Attempt.

महाराष्ट्रात अद्याप मराठा आरक्षणाचा प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. 25 जानेवारीपासून त्याच्या अंतिम सुनावणीला सुरूवात होत आहे.