मजुर असो किंवा अन्य कुणी, माझ्या महाराष्ट्रात कुणालाही उपाशीपोटी राहू देणार नाही- खासदार सुप्रिया सुळे
Supriya Sule (Photo Credits-Twitter)

देशभरासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लॉकडाऊनमध्ये सगळेच जण घरी आहेत. अशावेळी अनेक नेते मंडळी देखील त्यांच्या घरी आहेत. नागरिकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. यातच राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील फेसबुकच्या (Facebook Live) माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत केल्यानंतर अनेक परप्रांती शहरात अडकून पडले आहेत. तसेच त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अतिथी देवो भव म्हणत आपल्यासाठी आपल्या राज्यात येऊन काम करणारे प्रत्येकजण महाराष्ट्राच्या जडणघडणीत तयार झालेले मजुर असो किंवा अन्य कुणी त्यांचा मानसन्मान केला जात आहे. त्याला अन्नधान्याची मदत केली जात आहे. माझ्या महाराष्ट्रात कुणालाही उपाशीपोटी राहू देणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोनाच्या संकटात आम्हाला राजकारण करायचे नाही तर, समाजकारण करायचे आहे. मोदीसाहेबांच्या सरकारच्या सूचनांचे पालन करून हातात हात घालून राज्यसरकार 24 तास दिलेल्या सूचना असतील किंवा आम्ही केलेल्या सूचना असतील त्याचे पालन करण्याचे काम करत आहोत. आता आम्ही कुठलाही पक्ष पहात नाही. आता फक्त माणुसकी पहाणे गरजेचे आहे, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. तसेच माणुसकीच्या नात्याने आम्ही आमचे सगळे प्रयत्न करत आहोत. सर्वजण सहकार्य करत आहात. घरात 30 ते 35 दिवस राहणे सोपे नाही. आपण सगळे अडचणीवर मात करतोय त्यामुळे हा प्रश्न सुटल्यावर नक्की चांगले घडेल, अशीही खात्री त्यांनी व्यक्त केली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: मुंबई महानगरपालिकेत 2 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कक्ष सील

जोडप्याने खणली चक्क २५ फुट खोल विहिर; लॉकडाऊनच्या वेळेत पाण्याचा प्रश्न सोडवला - Watch Video

 

सुप्रिया सुळे यांचे फेसबूक लाईव्ह-

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबूकच्या माध्यमातून वारंवार जनतेशी संवाद साधला आहे. तसेच या अडचण परिस्थितीत नागरिकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, याविषायावर अनेकदा चर्चा केली आहे. यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी फेसबूक लाईव्ह करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहेत.