आजपासून मुंबईतील (Mumbai) सुप्रसिध्द माऊंट मेरी जत्रेला (Mount Mary Fair 2022) सुरुवात झाली आहे. पुढील आठ दिवस म्हणजे 11 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या जत्रेला 'वांद्रे महोत्सव' (Bandra Fest) असंही म्हटलं जातं. 100 वर्षापूर्वी पासून या जत्रेची परंपरा आहे. तरी ख्रिश्चन समाजात या जत्रेला विशेष महत्व आहे. तरी मुंबईसह (Mumbai) लांबून लोक या जत्रेत सहभागी होवून आनंद लूटतात आणि माऊंट मेरीचं दर्शन घेतात. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभुमिवर गेले दोन वर्ष या जत्रेच्या आयोजनावर निर्बंध होते मात्र यावर्षी माऊंट मेरी जत्रा (Mount Mary Fair) यावर्षी थाटामाटात पार पडणार आहे. या जत्रेला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. माऊंट मेरी चर्चमध्ये (Mount Mary Church) भाविक नवस मागण्यासाठी येतात आणि माऊंट मेरी समोर मेणबत्ती (Candle) लावून नवस मागतात.
या जत्रेत हे येशू ख्रिस्ताची आई मदर मेरीचे स्मरण करण्या करीता हा उत्सव पार पडतो. 2019 मध्ये ही जत्रा थाटामाटात साजरी करण्यात आली होती. त्यावर्षी जत्रेत एक लाखाहून अधिक लोकांनी सहभाग होता. तसेच मेणबत्त्या (Candles), फुले (Flowers), खाद्यपदार्थ (Food Items), खेळणी (Toys) आणि बनावट दागिन्यांची एकूण 430 दुकाने होती. तर दोन वर्षाच्या ब्रेक (Break) नंतर नागरिकांची मोठी गर्दी जत्रेच्या पहिल्याचं दिवशी बघायला मिळत आहे. (हे ही वाचा:-)
तरी गर्दीच्या पार्श्वभुमिवर मुंबई (Mumbai) महापालिकेसह (BMC) वाहतूक विभागाकडून विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) माउंट मेरी रोड (Mount Mary Road), परेरा रोड, केन रोड, हिल रोड (Hill Road), माउंट कार्मेल रोड (Mount Carmel Road) , चॅपल रोड, जॉन बॅप्टिस्ट रोड , सेंट या मार्गावर कोणत्याही प्रकारचे वाहन पार्क (Vehicle Parking) करण्यास मनाई केली आहे. तर मुंबई (Mumbai) महापालिकेकडून (BMC) परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) बसवण्यात आले आहेत. सोबतच पिण्याच्या पाण्याची (Drinking Water) सुविधा, डंम्पिंग क्षेत्र (Dumping Services), शौचालय (Toilet), प्रथमोपचार आणि देखरेख कक्ष उभारण्यात आले आहे.