Mumbai: गेल्या महिन्यात आपल्या नवजात बाळाचा गळा दाबून त्याला कचराकुंडीत फेकून देणाऱ्या आईला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी (Turbe Police) अटक (Arrest) केली आहे. प्राप्त माहितीनुसार, अविवाहित महिला तिच्या प्रियकरासोबतच्या नात्यात गरोदर राहिली. यासंदर्भात कोणालाही काही माहिती होऊ नये यासाठी तिने आपल्या पोटच्या मुलाची गळा दाबून हत्या केली.
नवी मुंबईतील तुर्भे येथील नागरी रुग्णालयाजवळील नवजात बालकाला डस्टबिनमध्ये टाकून दिल्याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी 18 जुलै रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सफाई कर्मचाऱ्यांना कचरा कुंडीमध्ये नवजात बालक आढळून आले होते. त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली होती. (हेही वाचा -Police Murder Case: शतपावली साठी गेलेले पोलीस निरिक्षक घरी परतलेच नाही; सकाळी परिसरात सापडला रक्तबंबाळ मृतदेह)
बाळाला वाशी येथील नागरी रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. हा परिसर झोपडपट्टी असल्याने तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आईचा शोध घेणे पोलिसांना कठीण गेले. (हेही वाचा - गतीमंद कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार, Nagpur Central Jail मधील प्रकार)
त्यानंतर पोलिसांनी आशा वर्कर्सची मदत घेतली आणि नुकत्याचं बाळाला जन्म दिलेल्या आईचा शोध घेण्यास सुरूवात केली. अखेर पोलिसांनी महिलेचा माग काढला आणि तिची चौकशी केली असता तिने मूल नको म्हणून आपल्या मुलाची हत्या केल्याचे कबूल केले.