मुंबई (Mumbai) शहरात सोमवारी (1 जुलै 2019) मुसळधार पाऊस पडला. गेल्या 48 तासात सरासरी तब्बल 550 मिलिमीटर पेक्षाही अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अधिकाधिक कमी त्रास होईल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. तरीही नागरिकांना आम्ही सावधानतेचा आणि काळजी घेण्याची विनंती करतो, असे अवाहन मुंबई महापालिका ( BMC) प्रशासनाने ट्विटरद्वारे केले आहे.
दरम्यान, शहरात प्रतिदिन 200 मिलिमीटर पडण्याची शक्यता आहे. ही स्थिती 3 जुलै ते 5 जुलै दरम्यान कायम राहण्याची शक्यताही महापालिकेने व्यक्त केली आहे. ही शक्यात गृहीत धरुन मुंबई महापालिकेने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याची विनंती केली आहे. (हेही वाचा, छे.. छे... 'मुंबईत पाणी तुंबलंच नाही'; महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा अजब दावा)
दरम्यान, मुंबई शहरात सोमवारी संततधार पाऊस कोसळला. त्यामुळे मुंबईतील सकल भागात पाणी साचलेच. परंतु, त्याचा परिणाम रेल्वे वाहतूक आणि रस्तेवाहतुकीवरही झाला. मुंबई मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. तर, शहरातील सस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी अनेक वाहतुक मार्गांत बदल केले. तर काही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले.