उन्हाने तापलेल्या महाराष्ट्राला पावसाचे वेध लागले आहेत. मान्सूनपूर्व पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावली असली तरी लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 21 जूनपर्यंत मान्सून कोकणात आणि 24 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून धडकेल, अशी माहिती हवामान खात्याने सांगितली आहे.
वायू चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याने नैर्ऋत्य मोसमी वारे सक्रीय झाले असून मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. (मुंबईकरांसाठी 'बीएमसी'चा MCGM मोबाईल ऍप, टोल फ्री कॉल आणि whatsapp नंबर, पावसाळ्यात समस्या आल्यास या क्रमांकावर मिळणार मदत)
एरव्ही मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होतो. त्यानंतर 8 दिवसात मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होते. मात्र यंदा मान्सून आगमन लांबणीवर पडले आहे. त्यात वायू चक्रीवादळाची भर पडली. मात्र आता लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.