Monsoon Session 2020: कोरोनामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता
Monsoon Session 2020 (Photo Credit: Twitter)

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi) पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन आठवड्यापूर्वीच गुंडाळावे लागले होते. तसेच जुलै महिन्यात होणारे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session 2020) 3 ऑगस्ट रोजी पार पडणार होते. मात्र, मुंबईत (Mumbai) कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशावेळी विधानसभा आणि विधानपरिषदेतील सदस्य मुंबईत येणे किंवा त्यांची राहण्याची सोय तसेच या आमदारांच्या स्टाफची व्यवस्था होणे कठीण आहे. यामुळे 3 ऑगस्ट रोजी विधिमंडळाचे पहिले पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच हे अधिवेशन सप्टेंबर महिन्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपाय योजना आखल्या जात आहेत. दरम्यान, चेहऱ्यावर मास्क लावून सोशल डिस्टन्सिंगचे पाळण करणे गरजेचे आहे. अधिवेशनाच्या काळात विधानभवनात मोठी गर्दी पाहायला मिळते. तसेच पोलिसांचाही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असतो. एवढेच नव्हेतर प्रशासकीय कामासाठी अनेक अधिकारी कर्मचारी विधानभवनात असतात. कोरोनाच्या संकट काळात इतक्या लोकांनी एकत्र येणे धोकादायक ठरले. यामुळे 3 ऑगस्ट रोजी होणारे अधिवेशन सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. कामकाज सल्लागार समितीच्या उद्या होणार्‍या बैठकीत याबाबत सर्व पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. हे देखील वाचा- मुंबईतील राजभवनासमोर निदर्शने केल्यानंतर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यामातून दिल्या 'अशा' प्रतिक्रिया

विधानसभा किंवा विधानपरिषदेच्या सभागृहात अधिवेशन न घेता सेंट्रल हॉलमध्ये बैठक घेता येईल का? याचाही विचार सुरू आहे. जेणेकरून 2 आमदारांमध्ये सुरक्षित अंतर ठेवता येईल. सरसकट सगळे आमदार बोलवण्याऐवजी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे येथील लोकप्रतिनिधींना बोलवून सभागृहाचे कामकाज चालवण्याचाही विचार आहे. महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य असून कामकाज चालवण्यासाठी 29 आमदारांच्या कोरमची गरज असते. त्यामुळे सत्ताधारी आणि भाजप पक्षाचे मिळून फक्त 30 आमदार बोलवून त्यात कामकाज करण्याचा पर्यायाचाही विचार सुरु आहे, अशीही माहीती समोर आली आहे.