मुंबईतील राजभवनासमोर निदर्शने केल्यानंतर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यामातून दिल्या 'अशा' प्रतिक्रिया

सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून भाजप राजस्थानसह विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. याविरोधात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वाखाली राजभवन, मुंबई (Raj Bhavan, Mumbai) येथे धरणे आंदोलन करण्यात आले. राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत बहुमत सिद्ध करण्यास तयार असतानाही विधानसभेचे अधिवेशन बोलावले जात नाही. लोकशाहीची हत्या करणाऱ्या या कृत्याचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत कॉंग्रेसच्या नेत्यांनी आंदोलन केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड (Ekhnath Gaikwad), शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad), माजी मंत्री नसीम खान (Naseem Khan), मुंबई युवक कॉंग्रेस अध्यक्ष गणेश यादव (Ganesh Yadav) व अन्य मान्यवर उपस्थित होते.

संविधान आणि लोकशाही परंपरांना पायदळी तुडवत राजस्थानचे राज्यपाल लोकनियुक्त सरकार पाडण्यासाठी भाजपला मदत होईल अशा प्रकारे वागत आहेत. त्याच्या विरोधात आज प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राजभवन, मुंबई येथे आंदोलन करून भाजप सरकारचा आणि राज्यपालांचा निषेध केला. त्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे देखील वाचा- Maratha Reservation: मराठा आरक्षण संदर्भात आज पासून सर्वोच्च न्यायालयात तीन दिवसीय सुनावणी सुरु; अंतिम निकालाकडे राज्याचे लक्ष

वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया-

अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया-

बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया-

सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षाची लोकनियुक्त सरकारे पाडणे व अनैतिक व भ्रष्ट मार्गाने सत्ता मिळवणे हीच भाजपची कार्यपद्धती राहिली आहे. त्यासाठी राज्यपालांच्या कार्यालयांचा म्हणजे राजभवनांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात येत आहे. अनेक राज्यातील सरकारे पाडण्याची षडयंत्रे राजभवनावर शिजली आहेत. राजस्थानात राज्यपालाची भूमिका संशयास्पद आणि पक्षपातीपणाची आहे. अशोक गहेलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. पण आमदारांचा घोडेबाजार करण्यासाठी भाजपाला अवधी मिळावा म्हणून राज्यपाल अधिवेशन बोलवत नाहीत असा आरोप करून राज्यपाल संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवत आहेत असे, बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.