सतत वाढणाऱ्या तापमानामुळे त्रासलेल्या सर्वांना अजून काही दिवस पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्रात 12 जूनपर्यंत पाऊस येणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह बळीराजाही काहीसा नाराज आहे.
18 मे ला मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला. मात्र त्याचा पुढील प्रवास मंदावल्याने अद्याप केरळमध्ये मान्सूनचे आगमन झालेले नाही. मात्र केरळसह महाराष्ट्रातील काही भागात येत्या काही दिवसात पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज आहे. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणपणे 8 दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो. ('अंदमान'मध्ये मान्सून दाखल; हवामान खात्याचा अंदाज अचूक)
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात ईशान्य भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर बिहार, झारखंड, दक्षिण कर्नाटक, केरळ आणि लक्षद्विप येथे तुरळक सरी बरसतील.