Monsoon Diseases: मुंबईत पावसाळी आजाराचे प्रमाण वाढले; सर्दी, खोकला, अंगदुखीने नागरिक हैराण
Monsoon Diseases | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची दुसरी लाट ओसरती आहे. प्रामुख्याने मुंबई शहरात कोरोना संसर्गाचा आलेख खालावतो आहे. हे दिलासादायक असले तरी सध्या मुंबईकरांना पावसाळी आजार (Monsoon Diseases) सतावताना दिसतो आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात पावसाळी आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्दी (Cold), खोकला (Cough), मुदतीचा ताप (Viral Fever), मलेरिया, डेंग्यू (Dengue) अशी लक्षणे घेऊन नागरिक रुग्णालयात गर्दी करत आहेत. कोरोना व्हायरस संसर्गाचे सावट असल्याने पावसाळी आजाराची लक्षणे घेवून येणाऱ्या रुग्णांबाबत अधिक काळजी घेण्याचे निर्देश रुग्णालयांना देण्यात आले आहेत. पावसाळी साथीच्या आजारांची लक्षणे घेऊन येणाऱ्या रुग्णांना तातडीने उपचार द्यावेत. तसेच, कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांना जवळच्या इतर रुग्णालयांमधील उपचार केंद्रांमध्ये दाखल करावे, असे निर्देशात म्हटले आहे.

प्रशासनाने रुग्णालयांना दिलेल्या निर्देशामध्ये म्हटले आहे की, ज्या वॉर्डांमध्ये कोरोना रुग्णांवर वैद्यकीय उपचा करण्यात आले त्याच रुग्णालयांमध्ये इतर रुग्णांनी उपचार देता येतील. मात्र, तत्पूर्वी संबंधी वॉर्डात स्वच्छता, निर्जुंतुकीकरण करण्यात यावे. आरोग्य्याच्या दुृष्टीने आवश्यक काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारची चालढकल करु नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

महापालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मुंबईत पावसाळी आजाराचे प्रमाण वाढते आहे. अनेक रुग्ण मलेरिया, डेंग्यू, व्हायरल ताप अशी लक्षणे आणि आजार असलेले रुग्ण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. अशा रुग्णांवर लक्षणानुसार उपचार केले जात आहेत. नागरिकांनीही पावसाळी आजारांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे भरमल यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर कमो होताना दिसत आहे. असे असले तरी रुग्णसंख्येत अपेक्षीत घट होताना दिसत नाही. शेवटची माहिती हाती आली तेव्हा पाठिमागील 24 तासात 7,761 जमांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. 13,452 जण कोरोनामुक्त झाले तर 167 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. राज्यात सध्या एकूण कोरोना सक्रीय रुग्णांची संख्या 1,01,337 इतकी आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 59,65,644 इतकी आहे. राज्यात आतापर्यंत 1,26,727 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.