गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईसह ठाण्यातील नागरिकांना आता दिलासा मिळला आहे. कारण मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत मान्सून पूर्व सरी शुक्रवारी कोसळल्याचे दिसून आले आहे. राज्यातील काही ठिकाणी साऊथ वेस्ट मान्सून आल्याचे दिसून आला असून हवामान खात्याने पुढील 48 तासात महाराष्ट्र व्यापणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले आहे.
आयएमडी यांच्याकडून पावसाचा अंदाज व्यक्त करत असे सांगण्यात आले आहे की, शनिवारसाठी यल्लो अलर्ट जाहीर केला असून शहारासह ठाण्यातील काही भागात अतिवृष्टी होणार आहे. त्याचसोबत मुंबई, ठाणे आणि पालघर मधील काही भागात येत्या 14 जूनला तुफान पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जूनच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्याने नागरिक सुद्धा सुखावल्याचे दिसून आले होते. (Monsoon 2020 Updates: महाराष्ट्र, गोव्यासह 'या' राज्यात पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा-IMD)
दरम्यान, शुक्रवारी हवामान खात्याने महाराष्ट्रातील मुंबईत, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ मधील काही भागात आणि दक्षिण गुजरात, दक्षिण मध्य प्रदेश, झारखंड आणि बिहार मधील काही क्षेत्रात 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण आणि गोवा मध्ये सुद्धा तुफान पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर मध्य प्रदेश मराठवाडा, आंध्र प्रदेशाच्या तटावर आणि उत्तर आंतरिक कर्नाटक, छत्तीसगढ, तेलंगणा, विदर्भ, आसाम आणि मेघालय येथए पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.