Monitor Lizard in Thane: ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात आढळली घोरपड; काही काळ स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण
Monitor Lizard (Photo Credits: Wikimedia Commons)

ठाण्याच्या (Thane)  वागळे इस्टेट (Wagle Estate) भागामध्ये  एक घोरपड (Monitor Lizard) आढळल्याने मोठी घबराट पसरली होती. पडवळनगर (Padwal Nagar) परिसरात नाल्यात ही घोरपड दिसल्यानंतर तातडीने Regional Disaster Management Cell कडून तिची सुटका करण्यात आली आहे. ही घटना 5 सप्टेंबर दिवशी दुपारी 12.30 च्या सुमारास घडली आहे. स्थानिकांना ही घोरपड मगर वाटली आणि त्याच्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

घोरपड 4 महिन्यांची मादी आहे तर सुमारे 3.5 फूट लांब होती. घोरपडीची सुटका केल्यानंतर तिला वन विभागाभागाच्या ताब्यात सोडण्यात आले आहे. यापूर्वी देखील वागळे इस्टेट भागामध्ये घोरपडी आढळल्या आहेत. नक्की वाचा: Shocking! चार जणांचा घोरपडीवर सामुहिक बलात्कार; घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आरोपींना अटक .

"ठाण्यातील वागळे इस्टेटमधील पडवळ नगरच्या मागे शफिक कंपाऊंडमधील एका छोट्या नाल्यात घोरपड आढळल्याची माहिती मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षात आम्हाला मिळाली. माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी आणि वनविभागाचे कर्मचारी एका पिकअप वाहनासह घटनास्थळी पोहोचले,” ठाणे आरडीएमसीचे प्रमुख यासिन तडवी यांनी मीडीयाशी बोलताना सांगितले आहे.

गेल्या महिन्यात ठाण्यातील नौपाडा येथील एका वस्तीत एक कोल्हा फिरताना दिसला होता. वृत्तानुसार, भास्कर कॉलनी परिसरात काही लोकांना दुर्मिळ सोनेरी कोल्हा दिसला. वन्यजीव कल्याण संघटनेच्या पथकाने सतर्कता दाखवून घटनास्थळी धाव घेत प्राण्याला पकडले.