Representational Image | (Photo Credits: PTI)

Mumbai: मुंबई (शहरातील मालाड (Malad) परिसरातील एका खासगी रुग्णालयात महिला रुग्णाचा सुरक्षारक्षका (Security Guard) ने विनयभंग (Molestation) केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री उशीरा सुरक्षा रक्षकाने महिला रूग्णाच्या वार्डमध्ये जाऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने प्रसंगवधान राखत अलार्म बेल वाजवली. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी महिलेजवळ हजर झाले. महिलेने सुरक्षा रक्षकाची तक्रार केल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. 21 वर्षीय सुरक्षा रक्षकाने महिला रूग्णाच्या खोलीत प्रवेश केला आणि तिचा हात पकडला. यावेळी रुग्णालयातील सर्व लोक झोपले होते. मात्र, पीडितेने आपल्याजवळील गजराची घंटी वाजविली. त्यानंतर रुग्णालयातील सर्व रुग्ण व डॉक्टर्स घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सुरक्षा रक्षकाला पकडले. (हेही वाचा - Diwali Guidelines 2020: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दिवाळी सणासाठी मार्गदर्शक सूचना जारी; फटाक्यांच्या आतषबाजी वर बंदी)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरक्षा रक्षकाने महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा महिलेने आवाज केला, तेव्हा रुग्णालयातील कर्मचारी तिथे पोहोचले आणि त्यांनी आरोपीला पकडले. (हेही वाचा - Mumbai: अंधेरी, जुहू परिसरात सुरु असणाऱ्या ड्रग्स रॅकेटचा NCB कडून पर्दाफाश; आरोपीस अटक)

दरम्यान, मुंबई पोलिस झोन 11 चे डीसीपी स्वामी यांनी सांगितले की, महिला रूग्णाच्या फिर्यादिनुसार, आरोपींविरोधात आयपीसीच्या कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला एका दिवसाच्या रिमांडवर तुरूंगात पाठविण्यात आले आहे. पीडित महिला रुग्णाची तब्येत सध्या ठीक असून गुरुवारी तिला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. या घटनेतील संबंधित सुरक्षा रक्षक गेल्या चार महिन्यांपासून या रुग्णालयात कार्यरत आहे.