Amravati News: लोकसभा निवडणूकी पूर्वी आज राजकिय पक्षांनी आपआपल्या उमेदवारांची नावे घोषित करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरु आहे. निवडणूकी पूर्वीच अमरावती शहरात नवनीत राणा विरोधात बॅर्नस झळकले आहेत. या बॅर्नसमुळे नवनीत राणा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यातत अडकल्या आहेत. (हेही वाचा- लोकसभा निवडणूक कार्यक्रम आज होणार जाहीर; जाणून घ्या ECI कधी घेणार पत्रकार परिषद
'मोदी आपसे बैर नही,राणा तेरी खैर नही' असा मजकूर असलेला बॅनर्स झळकले आहेत. हे पोस्टर विरोधी पक्ष नेत्याने लावले असावे असा अंदाज वर्तवला आहे. अमरावतीच्या शहराच्या राजापेठ चौकात खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात बॅनर्स लावले गेले आहे. अमरावीत या बॅनर्समुळे राजकारण तापले आहे. दरम्यान नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यांच्या भेटीत नेमके कोणते मुद्दे मांडले हे अद्याप समोर आले नाही.
अमरावतीत आज रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आहे. त्यामुळे अमरावीत मेळाव्याची तयारी सुरु आहे. सांस्कृतिक भवनात सांयकाळी ५ वाजता युवा स्वाभिमानचा मेळावा पार पडणार आहे. खासदार नवनीत राणा ह्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्ष आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांना साड्या वाटत केल्या होत्या. त्यानंतर त्या महिलांनी दिलेल्या साड्यांसंदर्भात टिका केली होत्या. त्यामुळे सोशल मीडियावर नवनीत राणा यांच्या विरोधात जोरदार टीका करण्यात आली होती.