मोदी सरकारने शेतकरी आणि कोरोनावरील लसी संदर्भात संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवावे, काँग्रेस नंतर आता NCP ची  मागणी
Nawab Malik (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राचे मंत्री आणि एनसीपी नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी असे म्हटले आहे की,अधिर रंजन चौधरी यांनी जे संसदेचे सत्र बोलणावण्याची मागणी केली आहे ती पूर्णपणे योग्य आहे. तसेच नवाब मलिक यांनी पुढे असे ही म्हटले की, संसदेचे सत्र थांबवणे ही योग्य पद्धत नाही आहे. विरोधक आणि शेतकऱ्यांकडून ही संसदेचे सत्र बोलावण्याची मागणी केली जात आहे. तर हे सत्र दोन दिवसांसाठीच का असो पण ते बोलवावे असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.(Maharashtra Winter Assembly Session 2020: महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबई मध्ये होणार)

नवाब मलिक यांनी पुढे असे ही म्हटले की, आरोग्य सेक्रेटरी यांनी कधीच म्हटले नाही की कोरोनाची लस सर्वांना दिली जाईल. यावर प्रश्न ही उपस्थितीत केला असून लस फ्री मध्ये देणार का असे ही विचारले आहे. त्यामुळे सरकारला शेतकरी आणि कोरोनाच्या लसी संदर्भातील मुद्द्यावरुन संसदेचे सत्र बोलावले पाहिजे.(Farmers Protest: सरकारकडून अमानुषपणे शेतकऱ्याचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न; मराठी साहित्यिकांचा आरोप)

दरम्यान, शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनच्या काळातच काँग्रेसने बुधवारी केंद्राला संसदेचे शीतकालीन सत्र बोलावण्यासाठी म्हटले होत. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी सरकारला कोणताही विलंब न करता हे सत्र बोलवावे अशी मागणी केली होती. त्यांनी ट्विट करत असे म्हटले होते की, शेतकऱ्यांनी दिल्लीला घेरले आहे. अर्थव्यवस्था अधिकृतरित्या मंदीत आहे. सरकारने वेळ न दवडता संसदेचे शीतकालीन सत्र लवकरात लवकर बोलावणे अत्यावश्यक आहे.

काँग्रेसची ही मागणी केंद्र सरकार आणि 32 शेतकऱ्यांच्या युनियन नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर समोर आली आहे. चर्चेचे चौथे सत्र गुरुवारी होणार आहे. तिवारी यांनी हे सुद्धा म्हटले होते की, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि चीन कडून होणारे अतिक्रमण लक्षात घेता सत्र बोलावण्याची गजर आहे. त्याचसोबत चीनने आपल्या जमीनीवर 1000 वर्ग किमी पेक्षा अधिक परिसरावर अतिक्रमण करत आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या रुग्णांच्या बळींचा आकडा गेल्या 8 महिन्यांत 1.38 वर गेला आहे.