Mobile tower collapsed in Pune: पुणे (Pune) शहर आणि जिल्ह्याती काही ठिकाणी आज (1 मे 2020) वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या वेळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोबाईल टॉवर (Mobile Tower) इमारतीवर कोसळला. ही घटना मंगळवार पेठ (Mangalwar Peth) परिसरात घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे पुणे लॉकडाऊन (Lockdown) आहे. त्यामुळे ही घटना घडली त्या परिसरात फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा या घटनेनंतर सुरु झाली आहे.
या घटनेबाबत पुणे महापालिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली. इमारतीवर टॉवर कोसळल्याची माहिती मिळताच पुणे माहापालिका कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. क्रेन आणि इतर उपकरणांच्या मदतीने हा टॉवर हटवण्याचे काम सुरु करण्यात आले, असे मोहोळ यांनी सांगितले.
मुरलीधर मोहोळ ट्विट
पुणे शहरात आज दुपारी झालेल्या पावसादरम्यान सोसाट्याच्या वाऱ्याने मंगळवार पेठ परिसरात मोबाईल टॉवर कोसळला आहे. या संदर्भातील माहिती घेऊन पुढील कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. सुदैवाने या घटनेत सजीव हानी झाली नसल्याचे समजत आहे. pic.twitter.com/ZrPs1xzkwl
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 1, 2020
अधिक माहिती देताना महापौर मोहोळ यांनी सांगितले की, ''पुणे शहरात आज दुपारी झालेल्या पावसादरम्यान सोसाट्याच्या वाऱ्याने मंगळवार पेठ परिसरात मोबाईल टॉवर कोसळला आहे. या संदर्भातील माहिती घेऊन पुढील कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. सुदैवाने या घटनेत सजीव हानी झाली नसल्याचे समजत आहे.'' (हेही वाचा, ठाणे शहरातील रस्त्यांवर फिरतोय Leopard? जाणून घ्या 'या' Viral Video मागील सत्य)
युट्युब व्हिडिओ
दरम्यान, राज्यातील काही भागात हलका, मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने या आधीच वर्तवली आहे. त्यानुसार राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, कोकण आणि इतर काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे शेतमाल शेतातच अडकून पडलेला शेतकरी मात्र चिंतेत आहे.