Police | (File Photo)

पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment) वेळी कॉपी करण्याचा एक हायटेक प्रकार पुन्हा एकदा पुढे आला आहे. हा प्रकार पिंपरी चिंचवड येथे घडला असून या प्रकरणी एका पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. पोलीस भरतीत चक्क 'मोबाईल मास्क' (Mobile Mask) वापरण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे या मास्कची निर्मिती या कॉन्स्टेबलनेच केल्याचे समजते. राहुल गायकवाड असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे. तो औरंगाबाद पोलीस दलात कर्तव्यास असल्याचे समजते. राहुल याने अनेक परीक्षार्तिंना हे मास्क पोलीस भरती वेळी दिल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. अशा प्रकारचा मास्क वापरुन एकाने नागपूर येथे पोलीस भरतीची लेखी परीक्षा दिली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथेही 19 नोव्हेंबरच्या पोलीस भरतीवेळी असाच प्रकार उघडकीस आला. हिंजवडीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींची तपासणी सुरु असताना ही घटना पुढे आली.

पोलीस भरती परीक्षेदरम्यान कॉपी करण्यासाठी 'मोबाईल मास्क' निर्मिीती करण्यापाठीमागे एक पोलीस कॉन्सेटबलच आहे हे पाहून पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी राहुल गायकवाड या कॉन्टेबलला अटक केली आहे. पोलीस भरतीसाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयात प्रक्रिया सुरु आहे. यासाठी 19 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा पार पडली. यावेळी एक विद्यार्थी कॉपी करत असताना आढळला. विशेष म्हणजे हा परिक्षार्थी कॉपीसीठी मोबाईल मास्क वापरत असल्याचे पुढे आले. हिंजवडी पोलिसांनी त्याचा हा डाव उधळून लावला. परीक्षागृहात जाण्यापूर्वी केल्या जाणाऱ्या तपासणी वेळी मास्कही तपासण्यात आला. यावेळी या विद्यार्थ्याच्या कृत्याचा भांडाफोड झाला. (हेही वाचा, पोलिस भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी परीक्षार्थीची अजब युक्ती; पहा Viral Video)

पोलिसांनी या विद्यार्थ्याचा मास्क जेव्हा तपासला तेव्हा ' एन 95' मास्कमध्ये चक्क मोबाईल डिव्हाईस, सीम कार्ड, बॅटरी, चार्जिंग कनेक्टर अशा वस्तू आढळून आल्या. या वस्तू म्हणजे विना बॉडी मोबाईल होता. हिंजवडी पोलिसांनी डिवाईसवरुन शोध सुरु केला. तसेच, विद्यार्थ्याकडेही कसून तपास केला असता या सर्व निर्मितीचा सुत्रधार राहुल गायकवाड असल्याचे पुढे आले.