अमित ठाकरे यांच्या कृतीचा MNS कार्यकर्त्यांकडून निषेध , नेमकं काय घडलं
Amit-Raj-Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Amit Thackeray Political Tour: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (MNVS) अध्यक्ष अमित ठाकरे येणार म्हणून कार्यकर्त्यांनी चार दिवसांपासून फिल्डींग लावली होती. शक्तीप्रदर्शन, एखादे उद्घाटन आणि मार्गदर्शन असा कार्यक्रमही ठरला होता. पण, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहता (Rahata Taluka) येथे अमित ठाकरे केवळ 20 संकेद थांबले. रात्रंदिवस मेहनत करुनही नेते नियोजित वेळ देऊनही थांबले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा पुरता हिरमोड झाला. परीणामी कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या कृत्याचा निषेध करत राजीनामे देण्याचा पवित्रा घेतला आहे. ही घटना राहता येथे घडली.

अहमदनगर जिल्ह्यात अमित ठाकरे यांना एक नव्हे तर दोन दोन ठिकाणी कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागल्याचे वृत्त मटा ऑनलाईनने दिले आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेत आगोदरच दोन गट आहेत. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष असतानाच अमति ठाकरे आले आणि त्यांनी वेळ देऊनही ती पाळली नाही. केवळ 20 सेंकंद तोंड दाखवले आणि पुढे निघून गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप होत होता. (हेही वाचा, Amit Thackeray: सिन्नरच्या टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची गाडी थांबवली, संतापलेल्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची केली तोडफोड (Watch Video))

अमित ठाकरे यांनी नुकताच उत्तर महाराष्ट्रात संपर्क दौरा काढला. या दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. ते नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरही आले. येथे त्यांनी एका महाविद्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली पुढे ते शनिशिंगणापूरला गेला. तेथे देवदर्शन घेतल्यावर ते पुढील प्रवासाला निघाले. राहता येथे ते किमान काही काळ थांबणार होते. त्यासाठी त्यांनी आगोदरच वेळ दिला होता. थेट नेत्याचीच वेळ मिळाल्याने कार्यकर्तेही उत्साहात होते. त्यांनी रात्रंदिवस खपून मंदिर दर्शन, फलकाचे उद्घाटन आणि कार्यकर्त्यांशी चर्चा असा कार्यक्रम आखला. सर्व काही निश्चित झाले होते. प्रतिक्षा होती ती ठाकरेंच्या आगमनाची. वेळ उलठून जात होता. पण ठाकरेंचा पत्ता नव्हता. अखेर ते आले आणि केवळ 20 सेकंद थांबले आणि लगेच पुढे शिर्डीच्या दिशेने निघून गेले.

कार्यक्रमाची जय्यत तयारी करुनही ठाकरे थांबले नाहीत. त्यांनी दिलेली वेळ पाळली नाही. त्यामुळे कार्यकर्ते संतापले. त्यांनी उद्घाटनासाठी तया केलेल्या फलकावरील कागद स्वत:च फाडला आणि निषेध व्यक्त केला. आम्ही नेता येणार म्हणून जोरदार तयारी केली. कार्यक्रमाचा घाट घातला. पण, नेत्याला त्याची काहीच कदर नाही. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. आम्ही संघटनेतील पदाचाच राजीनामा देण्याचा विचार करतो आहोत, असा विचार काही कार्यकर्त्यांनी या वेळी बोलून दाखवला.