'गरीब विद्यार्थ्यांना सरकार मोफत उच्च शिक्षण देणार का?' या प्रश्नावर महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) 'झेपत नसेल तर शिकू नका, असं उत्तर दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शिक्षण मंत्र्यांकडून असे वक्तव्य होणं संतापजनक आहे. अमरावतीच्या एका महाविद्यालयीन कार्यक्रमात विनोद तावडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आता विद्यार्थ्यांपासून राजकीय पक्षांनी यावरून विनोद तावडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय आहेत प्रतिक्रिया -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 'शिक्षण खात विकृतीच्या तावडीत सापडलंय' असं म्हटलं आहे.
#संतापजनक 😡 pic.twitter.com/m8Ub2eJk02
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 5, 2019
जगाचा इतिहास साक्ष आहे. जेव्हा-जेव्हा विद्यार्थ्यांना अटक करण्याचे सत्तेतील उर्मट पुढारी आदेश देतात. तेव्हा-तेव्हा ती सत्ता उलटवली जाते.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अटकेचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रातील सत्ता जाणार.
इतिहासाची पुनरावृत्ती होणार.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 5, 2019
नेमकं काय घडलं ?
अमरावती दौऱ्यावर असताना विनोद तावडे यांचा महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी थेट संवाद असा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रामामध्ये विद्यार्थ्याना तावडेंना थेट प्रश्न विचारण्याची मुभा होती. यावेळेस एका विद्यार्थ्याने गरीब विद्यार्थ्यांना तुम्ही मोफत शिक्षण देणार का? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळेस उत्तर देताना तावडे 'आर्थिकदृष्ट्या तुम्हाला झेपत नसेल तर शिकू नका, नोकरी करा' असे म्हणाले. तसेच हा कार्यक्रम सुरु असताना विद्यार्थी मोबाईल रेकॉर्डिंग करत होते. तावडेंनी विद्यार्थाला पकडून क्लिप डिलीट करण्याचे आदेश दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष अधिकच वाढला. काही स्थानिक विद्यार्थींनी तावडेंच्या पोस्टरला काळे फासले आणि त्यांचा निषेध केला.
Every student must read this. “The education minister of Maharashtra directs cops to arrest student”. Why? Because he was shooting an interaction! No tough questions please!
They want Youth only to man their electoral booths, not answer questions about education & jobs. pic.twitter.com/X7iv7XZzLs
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 5, 2019
आदित्य ठाकरेंनी मात्र या प्रकरणावर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.