राज्यातील सध्याच्या बदलत्या राजकीय घडामोडींवर मनसेतर्फे सह्यांची मोहीम (Signature Campaign) राबवली जात आहे. मनसेचं आज (8 जुलै) आणि उद्या (9 जुलै) 'एक सही संतापची' (Ek Sahi Santapachi) हे अभियान सुरु आहे. या अभियानाद्वारे मनसेकडून राजकीय घडामोडींचा (Maharashtra Politics) निषेध करण्यात येत आहे. राज्यात सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींचा विरोधात मनसेने आज आंदोलन छेडले आहे. मनसेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात एक सही संतापाची ही स्वाक्षरी मोहीम घेण्यात येत आहे. मुंबईच्या दादर विभागात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली आहे. (हेही वाचा - Sharad Pawar at Yeola: शरद पवार यांची येवला येथे सभा, छगन भुजबळ नाशिक दौऱ्यावर; घ्या जाणून)
या मोहिमेला मनसेचे नेते अमित ठाकरे, नितीन सरदेसाई देखील उपस्थित आहेत. त्यांनी स्वाक्षरी करुन या मोहिमेला सुरुवात केली आहे. या ठिकाणी राज ठाकरे यांची राज्यातील राजकारणावरील भाषणे एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात येत आहेत. सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेण्यात येत आहेत. तर एका भल्या मोठ्या फ्लेक्सवर सामान्य नागरिकांच्या स्वाक्षरी घेऊन राज्यातील या राजकारणाचा निषेध व्यक्त केला जात आहे.
पाहा फोटो -
एक सही संतापाची ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोहिमेला महाराष्ट्रभर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यातील काही क्षणचित्रं. २-२#संतापाचीसही#मनसे pic.twitter.com/ZYXRbZvCpY
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 8, 2023
नवी मुंबईतील वाशी आणि ऐरोली रेल्वे स्थानकावर आज मनसेच्या वतीने एक सही संतापाची हे अभियान राबवण्यात आले. राज्यात सुरु असलेल्या राजकारणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनसेतर्फे ही सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा खालावत चालला असून राजकारणाप्रति नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात स्वयंस्फूर्तीने या सह्याच्या मोहिमेत सहभागी होत आपला संताप व्यक्त केला. मनसेच्या वतीने विभागवार अभियान राबवण्यात येणार आहे.