मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 2 एप्रिलला पुणे येथे मेळावा घेणार
Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) येत्या 2 एप्रिलला पुणे (Pune) येथे मेळावा घेणार आहेत. तर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आज पुण्यात आयोजित करण्यात आलेले मनसेचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बैठक आणि नियुक्ती पत्रकांचे वाटप करणार होते. पण आजचे कार्यक्रम रद्द केल्यानंतर आता त्यासाठी नवी तारीख जाहीर केली आहे.(Coronavirus In Pune: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अवाहनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रद्द केली पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक)

पुणे शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मनसेकडून आजचा कार्यक्रम रद्द केला गेला आहे. आज राज ठाकरे पुण्यातच असणार असून उद्या मुंबईकडे रवाना होणार आहे. तर 2 एप्रिलला आता मनसेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून आगामी महापालिका निवडणूकीच्या दृष्टीकोनातून याला फार महत्व असणार असल्याचे बोलले जात आहे.(Parbhani Lockdown: आज रात्री 12 पासून परभणी मध्ये लॉकडाऊन)

दरम्यान, पुणे शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन  लागू करण्यात येणार नाही. मात्र, रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी 31 मार्च पर्यंत लागू असणार आहे, अशी माहिती पुण्याचे आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. संचारबंदीमध्ये विशेष नवे निर्बंध लागू करण्यात आले नाहीत. आगोदरचेच निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. या निर्बंधानुसार धार्मिक, समाजिक कार्यक्रमांना पोलीस परवानगी आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालयं ही 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येतील. अत्यावश्यक सेवा आणि या सेवेत येणारी दुकाने नीयमीत सुरु राहतील. पुणे शहरात लॉकडाऊन लावला जाणार नाही.