MNS MLA Raju Patil: मनसे आमदार राजू पाटील यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नामोल्लेख टाळत टीका

बाबरी पडत होती तेव्हा राज ठाकरे कोठे होते असा सवाल विचारणाऱ्या शिवसेनेला मनसे आमदार राजू पाटील यांनी जोरदार प्रत्युतर दिले आहे. ट्विटरवर एक चित्र पोस्ट करत आमदार राजू पाटील यांनी नामोल्लेख टाळत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. या चित्रात उद्धव ठाकरे यांच्या फोटोग्राफीच्या छंदावरुन टीका करण्यात आली आहे. '1995 ला युतीच्या माध्यमातून सेना सत्तेत येईपर्यंत आपण कुठे होतात हे अखंड महाराष्ट्राला माहित आहे', असे पाटील यांनी म्हटले आहे.

ट्विट