कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून 31 मेपर्यंत लॉकडाउनचा चौथा टप्पा कायम ठेवण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र, या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवताना अनेकदा पोलिसांवर हल्ले झाले आहेत. यामुळे महाराष्ट्र पोलिसांवर (Maharashtra Police) हल्ले रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे अनोखी मागणी केली आहे. पोलिसांना पेपर स्प्रे किंवा चिली स्प्रे वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केली आहे.
काही राज्ये या वेपनचा वापर करीत असून ते याबद्दल समाधान व्यक्त करत आहे. नियमानुसार, याचे वापर करून स्वसंरक्षण व गुन्हेगारी वर वचक हे दोन्ही साध्य होण्यास मदत होईल. तसेच येणाऱ्या काळात अनेक लोकांना रोजगार गमावण्याची शक्यता असून त्यामुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता असल्याने आपण आधीच काळजी घेऊन सज्ज राहायला हवे. यामुळे पोलिसांचे मनोबल सुद्धा उंचावण्यास मदत होईल. त्यामुळे आपण या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन ही हत्यारे (वेपन) पोलिसबांधवांना उपलब्ध करून दयावे, अशी विनंती बाळा नांदगावकर यांनी केली आहे. हे देखील वाचा- मुंबईत तात्पुरत्या स्वरुपात वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण बंद- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बाळा नांदगावकर यांचे ट्वीट-
प्रति
मा उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री महाराष्ट्र
विषय- पोलिसांना केंद्रीय रक्षा मंत्रालय चे कॅप्सी स्प्रे, चिली स्प्रे (मिरची चा फवारा) व कॅप्सी ग्रेनेड उपलब्ध करून देण्याबाबत.
महोदय गेली अनेक वर्षे पोलिसां वर विविध प्रकारचे हल्ले होत आहेत, अनेकदा ह्या हल्ल्यात ते जखमी होतात
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) May 20, 2020
गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई व्यतिरीक्त सूरत, अहमदाबाद या शहरांमध्ये पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सध्या आपल्या घरापासून दूर अडकलेले परप्रांतीय कामगार घरी जाण्यासाठी पोलिसांवर हल्ला करत असल्याच्या अनेक घटना गुजरातमध्ये समोर आल्या आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत पोलिसांवरील हल्ल्याच्या एकूण 244 घटना घडल्या आहेत. तसेच 823 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे