मुंबईत तात्पुरत्या स्वरुपात वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण बंद- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईतील (Mumbai) वृत्तपत्र वितरकांशी संवाद साधला आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात आपण रेड झोन आणि कंटेनमेंट क्षेत्रावर अधिक लक्ष दिले जात आहे. महाराष्ट्रातील उर्वरित भागामध्ये आपण काही प्रमाणात उद्योग, व्यवसाय, दुकाने व इतर बाबी सुरु केल्या आहेत. वृत्तपत्रे ही आपली दैनंदिन गरज आहे. मात्र, महाराष्ट्रावर संकट वावरत आहे. कोरोनाच्या भितीमुळे मुंबईत तात्पुरत्या स्वरुपात वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण बंद करण्यात आले आहे. तसेच परिस्थिती पाहून यातून लवकरच मार्ग काढू, असे उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले आहे.

मुंबईतील सोसायट्यांमध्ये कोरोना संसर्गामुळे वृत्तपत्र घेण्यास लोकांची तयारी नाही. त्यामुळे सुरक्षित अंतर पाळून स्टॉलवर विक्री करीत असल्याचे सांगितले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आपण काही जीवनावश्यक वस्तू, अन्न पदार्थ यांची घरपोच वितरणास परवानगी दिली आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेणे गरजे आहे. अन्यथा प्रादुर्भाव वाढून आरोग्याला धोका होऊ शकतो, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना दिला आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. हे सत्य आहे. लॉकडाउनबाबत काहीजणांकडून माझ्यावर टीका केली जात आहे. परंतु, महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी टीकेचा धनी होईन. टीकेला लगेच उत्तर देणार नाही, कारण आत्ता मला जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे वाटते. कोणत्याही परिस्थितीत आपल्या सर्वांची काळजी मी घेणारच, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. हे देखील वाचा- Lockdown: लॉकडाऊन काळात महाराष्ट्र पोलिसांवर हल्ल्याच्या 244 घटना, 823 जणांना अटक

ट्वीट-

मुंबईत आज 1 हजार 372 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 41 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 23 हजार 935 वर पोहचली आहे. यापैकी 841 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 6 हजार 644 जण कोरोनामुक्त झाले आहे.