Home Minister Anil Deshmukh | (Photo Credits: Facebook Live Screenshot)

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या महाराष्ट्र पोलीस कोरोना विरोधात लढा देत आहेत. दरम्यान, अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, असे असताना काही समाज कंटक पोलिसांवर हल्ला करत आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत 23 मार्च 2020 ते 20 मे 2020 या कालावधीत पोलिसांवरील हल्ल्याच्या एकूण 244 घटना घडल्या आहेत. तसेच 823 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचे संकट आपल्या देशात वावरत असताना महाराष्ट्रात 1 लाख 11 हजार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी 4 लाख 12 हजार 359 पास वितरित करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 142 पोलीस अधिकारी आणि 1 हजार 246 पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहे, अशीही माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. हे देखाली वाचा- मराठी चित्रपट, नाट्य क्षेत्र, मालिकांचे निर्माते, कलाकारांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद

ट्वीट-

देशात येत्या 31 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश लागू राहणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच कोणत्याही नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून चुकीच्या माहितीचा प्रसार करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे.