कोरोना विषाणूने संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भात पाहता 31 मेर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांसह मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील मनोरंजन उद्योगातील विशेषत: मराठी चित्रपट, नाट्य क्षेत्र, मालिकांचे निर्माते, कलाकारांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे (Video Conferencing) संवाद साधला आहे. अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. संजय मुखर्जी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी होते.
निर्मात्यांना विनातारण आणि कमी व्याजाचे कर्ज, एक पडदा चित्रपटगृहांना वाचविणे, गरीब संगीतकारांना मदत, मराठी चित्रपटांना अनुदान, चित्रपट निर्मितीवरील जीएसटी माफ करणे, सांगली-कोल्हापुरात चित्रीकरणाला परवानगी देणे, पोस्ट प्रॉडक्शन सुरु करणे अशा विविध मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहेत. नाट्य आणि चित्रपटगृहे ही सार्वजनिकरित्या एकत्र येण्याची ठिकाणे असल्याने तिथे लगेच काही परवानगी देता येईल, असे वाटत नाही. मात्र, पावसाळ्यापूर्वी काही चित्रीकरणे शक्य होतील का? ते सांस्कृतिक कार्य विभाग व निर्मात्यांनी पहावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus: पुण्यात स्वॅब टेस्टिंगची क्षमता वाढवण्यास राज्य सरकारने मान्यता द्यावी; विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
ट्वीट-
महाराष्ट्रातील मनोरंजन उद्योगातील विशेषत: मराठी चित्रपट, नाट्य क्षेत्र, मालिकांचे निर्माते, कलाकारांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद. अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. संजय मुखर्जी सहभागी. pic.twitter.com/XsIy75MBkX
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 20, 2020
कंटेनमेंट झोन्समध्ये चित्रीकरण स्थळे नाहीत ना? यासह चित्रीकरण पथकातील लोकांची संख्या, त्यांचे राहणे-जेवणे या गोष्टी देखील पाहाव्या लागतील. संपादन प्रक्रिया करणाऱ्या स्टुडिओमध्ये परवानगी द्यायची असेल तर, तेथील जागा, वातानुकूल यंत्रणा याबाबतही सूचना द्याव्यात. महत्वाचे म्हणजे, चित्रपटनगरीतील सध्या ज्यांचे सेट्स उभे आहेत त्यांना भाडे सवलत, लोककला, तमाशा कलावंत यांना जगविण्यासंदर्भात निश्चितपणे विचार करणार आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. हे सत्य आहे. लॉकडाउनबाबत काहीजणांकडून माझ्यावर टीका केली जात आहे. परंतु, महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी टीकेचा धनी होईन. टीकेला लगेच उत्तर देणार नाही, कारण आत्ता मला जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे वाटते. कोणत्याही परिस्थितीत आपल्या सर्वांची काळजी मी घेणारच, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.