राज ठाकरे, मनसे अध्यक्ष (file photo)

गेल्या 7 डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूकीचे मतदान पार पडले होते. तर मंगळवारी 11 डिसेंबर रोजी या निवडणूकांचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये राज्यामध्ये वर्चस्व असणाऱ्या भाजप (BJP) पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून मोदी सरकारवर टीका केली आहे.

मंगळवारी लागलेल्या पाच राज्यांच्या निकालामध्ये छत्तीसगढ(Chhattisgarh) आणि मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) गेल्या 15 वर्षांपासून वर्चस्व असलेल्या भाजपने सत्ता गमावली आहे. तर राजस्थान (Rajasthan) मध्येही 5 वर्षांपासून असलेली सत्ता भाजपने गमावली आहे. तसेच मिझोराम आणि तेलंगणा(Telangana) मधून ही भाजप पक्षाला जास्त जागा जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांनी मोदी सरकारची खिल्ली उडवत त्यांच्या व्यंगचित्रातून मोदी आणि भाजपवर टीकास्र सोडले आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी बसलेल्या खुर्चीवर 'अहंकार' असे लिहिले आहे. तर त्यांच्यापाठी अमित शहा घाबरुन खूर्ची पकडून बसलेले दिसत आहेत. तसेच जमिनीला तडा गेल्याचे ही चित्रातून राज ठाकरे यांनी स्पष्ट रेखाटले आहे. मात्र भाजप सत्ता हरल्यामुळे मोदी सरकारची झोपच उडाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मोदींनी दिलेली आश्वासने पाळली नसल्याच्या ही टीका त्यांच्यावर करण्यात येत आहेत.