
आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day) हा राजमाता जिजाऊ यांच्या नावाने ओळखला जावा, अशी भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. मनसे (MNS) स्थापनेस 19 वर्षे पूर्ण झालेबद्दल आयोजित कार्यक्रमात पिंपरी चिंचवड येथे ते बोलत होते. या वेळी बोलताना त्यांनी आगामी गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने विशेष भाष्य करणे टाळले. दरम्यान, कालच (8 मार्च) पार पडला. जगभरातील महिलांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. खरं म्हणजे पुरुषांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी एकमेकांना का दिल्या काय माहिती, अशा आशयाचा एक मिश्कील विनोदही ठाकरे यांनी केला. दरम्यान, प्रयागराज येथे पार पडलेल्या कुंभमेळा आणि तिथे लोकांनी गंगा प्रदुषणावरही (Ganges River Pollution) भाष्य केले.
कोण पिणार ते गंगेचे पाणी?
राज ठाकरे यांनी आगामी काळात पक्षशिस्त अधिक काटेकोरपणे पाळली जाईल. त्यासाठी लवकरच एक सूत्रबद्ध कार्यपद्धती राबवली जाणार आहे. जी माझ्यासकट मनसेतील सर्वांना लागू असेल. अलिकडेच पक्षाची मी एक बैठक घेतली. या बैठकीस अनेकांनी दांडी मारली. म्हणून मी थोडी शाळा घेतली, त्यावर अनेकांनी उत्तर दिले आम्ही कुंभमेळ्यात गंगेत स्नान करायला गेलो होतो. मी त्यांना म्हणालो, गधड्यांनो इतकी पापं करताच कशाला? दरम्यान, आमचे बाळ नांदगावकर देखील तिकडे गेले होते. येताना कमंडलूमधून गेगेचे पाणी घेऊन आले. ते मलाही देत होते. मी म्हणालो, हड् कोण पिणार ते पाणी. पूर्वी ठिक होतं. सोशल मीडिया नव्हता. पण मी पाहात होतो. तिथे गंगेत आंघोळ करायला लोक येत होते. ते थेट गंगेत अंघोळ करत होते. फक्त पुरुषच नव्हे तर महिलाही.. ते अशी अंघोळ करत होते.. (काखेत खाजवल्याची नक्कल करत) की, तेथे जाऊन घासत होते. अशा प्रकारे प्रदुषीत झालेले पाणी कोण पिणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (हेही वाचा, Sonali Bendre-Raj Thackeray Get Spotted Together: मुंबईत मराठी भाषा दिनी आयोजित कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांची हजेरी (Watch Video))
मनसे कार्यकर्त्यांना पक्षनेतृत्वाकडून शुभेच्छा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व सहकारी, पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना मनःपूर्वक शुभेच्छा! pic.twitter.com/rx57hMKRbg
— Amit Thackeray (@amitrthackeray) March 9, 2025
राज कपूर यांनी वेगळीच गंगा दाखवली
राज ठाकरे पुढे बोलतान म्हणाले, आम्ही जगभरातील देशांमध्ये जातो, तिथे नद्या पाहतो. ते तिकडे नद्यांना काही माता वैगेरे मानत नाहीत. पण त्यांच्या नद्या प्रचंड स्वच्छ असतात. आपल्याकडे काय वाट्टेल ते चाललेलं असतं. मी कित्तेकदा पाहतो, स्वमिंग पूल उद्घाटनावेळी निळा असतो.. नंतर त्याचे पाणी हिरवं व्हायला लागतं. नद्यांचही तसंच आहे. राजीव गांधी पंतप्रधान असल्यापासून आम्ही गंगा साफ होणार असं ऐकतो आहे. पण काही झाली नाही. मध्ये त्या राज कपूर यांनी सिनेमा काढला. लोकांना वाटलं झाली गंगा साफ. पण त्यात त्यांनी वेगळीच गंगा दाखवली. लोक म्हणाले, अशी जर गंगा साफ असेल तर आम्हीपण आंघोळ करायला तयार आहोत, असे म्हणत त्यांनी देशातील नदी प्रदुषणावर भाष्य केले.