Raj Thackeray in Nashik: शरियतसारखा कायदा आणा, महिलांवरील अत्याचार थांबतील - राज ठाकरे
Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य आणि देशभरात वाढत असलेल्या बलात्काराच्या घटनांबाबत पुन्हा एकदा सडेतोड मत व्यक्त केले आहे. शरियतसारखा कायदा (Sharia Law ) आणा, मग महिलांवरील अत्याचार थांबतील असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ते आज (23 सप्टेंबर) नाशिक दौऱ्यावर आहेत. या वेळी प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज ठाकरे यांनी या वेळी विविध मुद्द्यावर भाष्य केले. ते म्हणाले जनतेला गृहीत धरून निर्णय घेतले जात आहेत. निवडणूक आयोगाने याची गंभीर दाखल घ्यायला हवी. राज्य सरकारने नुकतीच महापालिका निवडणुकीसाठी बहुसदस्यीय पद्धतअवलंबन्याचा निर्णय घेतला. यावर ते बोलत होते. सरकारने इतर निवडणुकांसाठी का नाही निर्णय घेतला असेही ते म्हणाले.

राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत घेतलेल्या निर्णयावरुन टीका करताना राज ठाकरे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे तीन आमदार किंवा तीन खासदारांचा एक प्रभाग करणार का? ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणूक यांदरम्यान येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये एकच पद्धत आहे. ती म्हणजे प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार. महाराष्ट्रात हे कुठून सुरू झालं? याचे एकमेवकारण म्हणजे प्रभागरचना, त्यातील उमेदवारांची संख्या हे वारंवार बदलून सत्ता मिळवणे हे एकच गणीत त्यापाठीमागे आहे, असा आरोपराज ठाकरे यांनी या वेळी केला. जनतेला गृहीत धरायचं, हव्या त्या पद्धतीने प्रभाग करायचे. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करायला हवी. महाराष्ट्राचा कायदा देशापेक्षा वेगळा आहे का? हा कसला खेळ चालू आहे? उद्या तीन आमदार किंवा तीन खासदारांचा एक प्रभाग करणार आहात का? असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. (हेही वाचा, BMC Election: शिवसेनेला मोठा धक्का, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश )

नाशिक महापालिका निवडणूक नजरेसमोर ठेऊन मनसे कमला लागली आहे. नाशिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही फेरबदल करण्यात आले. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत याची घोषणा झाली. आजच्या दौऱ्यात राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिऱ्यांसोबत संवाद साधला. तसेच नागपूरचे पोलिस प्रमुख पांडे यांचीही भेट घेतली.