आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Mumbai Municipal Corporation) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह अनेक पक्षांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, अनेक शिवसैनिकांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश केला आहे. शिवसैनिकांनी आज मोठ्या संख्येत मनसेमध्ये प्रवेश केल्याने, हा एकप्रकारे शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. मुख्यमंत्री आणि शिवसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या निवडणुकीची जबाबदारी पर्यावरण मंत्री आणि युवासेना अदित्य ठाकरे यांच्यावर सोपवण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढल्यास शिवसेनेला अधिक फायदा होण्याची शक्यता आहे, असा दावा शिवसैनिकांकडून केला जात आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईमधील मीरा-भाईंदर व चांदीवली विधानसभा क्षेत्रातील अनेक शिवसैनिकांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला आहे. यावेळी मनसेचे ठाणे प्रमुख अविनाश जाधव, मीरा-भाईंदर शहर अध्यक्ष हेमंत सावंत, कामगार सेनेचे उपाध्यक्ष संदीप राणे यांच्यासह अनेक नेते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. हे देखील वाचा- Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नामफलकावर फेकली शाई, भाजप नगरसेविकेसह दहा जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ट्वीट-

मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर, भारतीय जनता पक्षाला 82 जागा मिळाल्या आहेत. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला होता. मात्र, या निवडणुकीत मनसेच्या जागा वाढण्याची शक्यता आहे, असे भाकीत मनसे नेत्यांकडून केले जात आहे.