MNS President Raj Thackeray | (File Image)

लवकरच येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पेक्ष आक्रमक झाले या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray)आज पुण्यात दाखल झाले आहे. आज पुणे दौ-यादरम्यान ते येथील मनसे पदाधिका-यांची बैठक देखील घेणार आहे. येत्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मनसेचे पुढील रणनीती काय असेल यावर ते चर्चा करणार आहे. त्यामुळे मनसेची आजची बैठक ही ही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Maharashtra Gram Panchayat Election 2020) खूप महत्त्वाची ठरणार यात वाद नाही,

या निवडणुकीसाठी येत्या 23 डिसेंबरपासून उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा उमेदवार उभा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याच्या सूचनाही राज ठाकरे यांनी दिल्या आहेत, अशी माहिती समोर येत आहे. मनसेही या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.हेदेखील वाचा- Maharashtra Gram Panchayat Election: महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात दाखल होणार

मागील वर्षी 31 मार्च 2020 ला ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार होते. मात्र कोरोना व्हायरसमुळे उद्धवलेल्या परिस्थितीमुळे 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. दरम्यान, राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान तर, 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडी, भाजप यामध्ये जोरदार टक्कर होणार आहे. मात्र मनसेही आपल्या परीने सर्वोतोपरी प्रयत्न केला असून जास्तीत जागा जिंकण्याचा मानस ठेवला आहे.