राज ठाकरे आणि गिरिश महाजन (फोटौ सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि पुणे येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच या राज्यात विविध ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांसह प्राण्यांचे हाल होत आहे. तर गुरुवारी कोल्हापूर (Kolhapur) येथे पूरग्रस्तांच्या भेटीसाठी जलसंपदामंत्री गिरिश महाजन (Girish Mahajan) केले होते. मात्र त्यावेळी गिरिश महाजन यांनी तेथील पूरस्थितीचे गांभीर्य विसरुन सेल्फी घेण्याच्या नादात दिसून आले. तसेच सेल्फी घेत असताना बोटीमधील पोलीसांसोबत हसत असल्याचे दिसले. यावरुन महाजन यांच्या या वागण्यावरुन संताप व्यक्त केला जात आहे. तर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सुद्धा महाजन यांच्या प्रकारावर नाराजगी व्यक्त करत टीका केली आहे.

मनसेच्या अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट करत असे म्हटले आहे की, पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्री फक्त हवाई पाहणी करत आहे. तर दुसऱ्या बाजूला गिरिश महाजन हे सेल्फी घेत असल्याचे दिसून आले. महाजन यांच्या या प्रकारावरुन ते टीकेचे धनी ठरले आहेत. तसेच महाजन यांना माहिती आहे असे सगळे कृत्य केले तरीही ते निवडणू येणार असल्याने हा एक प्रकारचा माज त्यांना आला आहे अशी संतप्त शब्दात त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे.(महाराष्ट्रात पुराने एका आठवड्यात घेतले 30 बळी, 2 लाखाहून अधिक नागरिकांचे स्थलांतर: Maharashtra Monsoon & Flood 2019 Live Updates)

तसेच राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा महाजन यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. मुंडे यांनी ट्वीट करत गिरीज महाजन हे अधिकाऱ्यांसोबत पुराची पहाणी करण्यासाठी गेले आहेत की सेल्फी घेण्यासाठी असे खडे बोल सुनावले आहेत. त्याचसोबत सत्ताधाऱ्यांना नागरिकांचे पुरस्थितीमुळे झालेले हाल पाहून सुद्धा संवेदना उरल्या आहेत की नाही असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रकारावर देवेंद्र फडणवीस यांनी अशा असंवेदनशील मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेत अधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी विनंती केली आहे.