मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) पाच दिवसीय विदर्भाच्या (Vidarbha Tour)दौऱ्यावर आहेत. दरम्यान नागपूर (Nagpur), चंद्रपूर (Chandrapur) आणि अमरावती (Amravati) या तीन जिल्ह्याना राज ठाकरे (Raj Thackeray) भेट देणार आहेत. नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे सध्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान राज ठाकरे पदाधिकाऱ्यासह विशेष बैठका घेणार आहेत. चंद्रपूरात राज ठाकरेंच जंगी स्वागत (Welcome) करण्यात आलं. एवढचं नाही तर राज ठाकरेंना एक झलक बघण्यासाठी चंद्रपूरात मोठी गर्दी झाली होती. चंद्रपूर दौऱ्यातील एक अनोखी बाब म्हणजे राज ठाकरेंनी चंद्रपूरात एक दोन नाही तर तब्बल चार केक विकत घेतले आहेत. चंद्रपूर शहरातील सुप्रसिध्द एन.डी. हॉटेल (N D Hotel) मधून केक शॉप (Cake Shop) येथे जाऊन राज ठाकरे यांनी स्वखर्चाने चार केक (Cake) खरेदी केले आहेत.
पण हे चार केक खरेदी करण्यामागचं नेमक कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. संबंधीत राज ठाकरेंना (Raj Thackeray) प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले केक खरेदी करण्याचं काही विशेष कारण नाही. तरी राज ठाकरेंच्या या अचानक केक (Cake) खरेदीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. सध्या राज ठाकरे (Raj Thackeray) चंद्रपूरात (Chandrapur) असले तरी लवकर ते अमरावतीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. (हे ही वाचा:- High Court On Narayan Rane Bungalow: केंद्रीय मंत्री नारायण राणेच्या घरावर फिरणार बुलडोजर, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश)
आज आणि उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) अमरावाती (Amravati) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. दरम्यान पदाधिकाऱ्यासह विशेष बैठका घेणार असुन अमरावती जिल्ह्याबाबतची विशेष माहिती घेणार आहेत. नागपूर (Nagpur), चंद्रपूर (Chandrapur) आणि अमरावती (Amravati) जिल्ह्याच्या या पाच दिवसीय दौऱ्यानंतर राज ठाकरे 22 सप्टेंबरला मुंबईत (Mumbai) परतणार आहे.