महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर (Varsha Bangla) दाखल झाले आहेत. वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान आहे. ही भेट व्यक्तीगत असल्याचे सांगितले जात असले तरी या भेटीचे वेगवेगळे आर्थ काढले जात आहेत. या भेटीवेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि दुसरे एक मंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित आहेत. या भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक आणि आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक या दोन विषयांवर अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे 'वर्षा' बंगल्यावर अचानक दाखल झाल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात ही भेट व्यावसायिक असून त्या दृष्टीनेही या बैठकीत चर्चा होईल असा तर्क लावला आहे. भेटीचे कारण आणि कोणताही तपशील बाहेर आला नाही. त्यामुळे ही भेट कोणत्या मुद्द्यावर आहे हे देखील समजू शकले नाही. दुसऱ्या बाजूला भेटदरम्यानची बैठक नुकतीच सुरु झालीआहे. बैठकीतील कोणी व्यक्ती जर बाहेर आली आणि त्यांनीच जर याबाबत काही माहिती दिली तरच बैठकीतील चर्चेचा नेमका तपशील समजू शकणार आहे. (हेही वाचा, Raj Thackeray Tweet: सध्याच्या राजकीय घडामोडींवर मनसैनिकांनी आपली भुमिका मांडू नये, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन)
दरम्यान, शिवसेनेत पडलेली मोठी फूट. त्यामुळे राज्यात झालेले संत्तांतर या पार्श्वभूमीवर आगामी काळात होऊ घातलेली मुंबई महापालिका निवडणूक आणि सध्या सुरु असलेली अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी याबाबत या बैठकीत विशेष चर्चा होईल असा तर्क आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात याच तर्कावर अधिक जोर देण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र ही बैठक नेमकी कोणत्या कारणास्तव आयोजित करण्यात आली आहे याबाबत कोणतीही माहिती बाहेर आली नाही. तानाजी सावंत आणि मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीमुळे मात्र अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत
मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असल्याने अशा प्रकारच्या भेटीगाठी होतच राहतात. परंतू, काही विशिष्ट काळात झालेल्या भेटींना अधिक महत्त्व असते. राज ठाकरे यांच्या या भेटीलाही अशाच प्रकारचे महत्त्व असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसते आहे.