अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 2 दिवसांच्या भारत दौर्यावर येणार आहेत. दरम्यान त्यांच्या साठी 'केम छो मोदी' या ह्युस्टनमधील भव्य कार्यक्रमाप्रमाणेच अहमदाबादमध्ये ‘केम छो मिस्टर प्रेसिंडेंट’ या कार्यक्रमाचं आयोजन होणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमेय खोपकर यांनी आक्षेप नोंदवला आहे. मराठी ही देशात बोलली जाणारी दुसरी प्रादेशिक भाषा असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौर्यातील कार्यक्रमाचं आयोजन पुन्हा गुजराती असल्याने ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान अमेय खोपकर यांनी याबाबत ट्वीट करून आपला निषेध नोंदवला आहे. अहमदाबाद विमानतळ ते मोटेरा स्टेडियम दरम्यान स्वागताला 5-7 लाख लोकं असतील: डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्यासाठी उत्सुक.
दरम्यान 24 आणि 25 अशा दोन दिवसांच्या भारत दौर्यावर डोनाल्ड ट्रम्प येणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील असतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीमध्ये एक कार्यक्रम दिल्ली तर दुसरा कार्यक्रम अहमदाबाद मध्ये होणार आहे. काल अमेरिकेमध्ये मीडियाशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अहमदाबादमध्ये विमानतळ ते न्यू स्टेडियम दरम्यान सुमारे 5-7 लाख लोकं स्वागतासाठी असतील असं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अशी माहिती दिली आहे.
अमेय खोपकर यांचे ट्वीट
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) February 12, 2020
ट्र्म्प-मोदी या भेटीदरम्यान दोन्ही देशामधील व्यापार, संरक्षण अशा विषयांवर करार होण्याची तसेच चर्चा होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. सोबतच येत्या काही दिवसांतच अमेरिकेमध्ये राष्ट्रध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातील भारत दौर्याला विशेष महत्त्व आहे. अमेरिका आणि भारत देशामध्ये संबंध दृढ करण्यासाठी या दौर्यात प्रयत्न केले जाणार आहेत.