Raj Thackeray & MNS New Flag| Photo Credits: File Photo

मराठीचा आग्रह धरत अमेझॉन (Amazon) या ई कॉमर्स साईटवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करण्याची मागणी पूर्ण झाल्यानंतर आता मनसे पश्चिम रेल्वेकडे वळली आहे. पश्चिम रेल्वे मध्ये माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा अशी मनसेची मागणी आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील (Jitendra Patiil) यांनी पश्चिम रेल्वेला पत्र धाडलं आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार, प्रत्येक राज्याप्रमाणे स्थानिक भाषा वापरणं बंधनकारक आहे, मात्र त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात पुरेशी होत नसल्याचं सांगत मनसेने आता पश्चिम रेल्वेला पत्र पाठवलं आहे. MNS vs Amazon: अॅमेझॉनवर लवकरच दाखल होणार मराठी भाषेचा पर्याय; मनसे नेते अखिल चित्रे यांची ट्विटद्वारे माहिती.

पश्चिम रेल्वे विभागाने तातडीने मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा या मागणीची गंभीर दखल घेऊन भविष्यात प्रसिद्ध होणारी पत्रकं, जाहिरातीमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक करावा तसे न झाल्यास तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा मनसे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिला आहे

मनसे ट्वीट

काही दिवसांपूर्वी मनसेने देखील अमेझॉनला मराठीचा पर्याय वेबसाईटवर खुला करून द्यावा अशी मागणी केली होती. त्याची अंमलबजावणी होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर मनसेने खळ्ळ खट्याक आंदोलन छेडत पुणे आणि मुंबईमधील काही कार्यालयं फोडल्यानंतर मनसे आणि अमेझॉनमध्ये चर्चा झाली आणि भविष्यात मराठीचा पर्याय दिसेल असे आश्वासन देण्यात आले आहे.