MMRDA कडून मुंबई मेट्रोच्या 2A आणि 7 मार्गावरील 3 स्थानकांची नावं बदलणार आहे. एमएमआरडीए कडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशन मध्ये बदलण्यात येणार्या नावांची माहिती देण्यात आली आहे. 2A लाईन वरील 3 स्थानकांच्या नावामध्ये बदल करण्याला संबंधित विभागाकडून मंजुरी देण्यात आल्याचं त्यामध्ये सांगण्यात आले आहे.
दरम्यान 2A लाईन वर पहाड एकसार मेट्रो स्टेशन आता नाव बदलून शिंपोली केले जाणार आहे. वळणाई स्टेशनचं नाव आता वळनाई मीठ चौकी करण्यात येणार आहे तर पहाडी गोरेगाव स्टेशन आता बांगूर नगर केले जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. नक्की वाचा: Mumbai Metro Yellow Line 2A and Red Line 7 Timings: मुंबई मेट्रोच्या 2A आणि 7 वर पहिली आणि शेवटची मेट्रो कधी? इथे पहा 21 जानेवारीपासूनचं नियमित वेळापत्रक .
प्रवाशांचा नव्या मेट्रो लाईनला देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण काहींच्या सूचनेनुसार, मेट्रो स्टेशनची नावं घोळ घालणारी आहेत. त्यांच्या बदल किंवा कंसात लोकप्रिय लॅन्डमार्क देण्यात यावा.
वळणाई हे ठिकाण फारसे लोकांना ठाऊक नाही. हा भाग मीठ चौकी म्हणून अनेकांना ठाऊक आहे. तसाच प्रकार पहाडी गोरेगाव बाबतही आहे. अनेकांना हे ठिकाण परिचित नाही त्यामुळे यामध्ये बदल करण्यात यावेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी महिन्यात मुंबईतील मेट्रो दोन अ आणि मेट्रो 7 या दोन्ही मार्गिकाचे लोकार्पण केले होते. त्यावेळी त्यांनी स्वतः मेट्रो मधून प्रवास देखील करून प्रवाशांसोबत संवाद साधला होता.