 
                                                                 पुण्यामध्ये सद्या पदवीधर मतदारसंघातून होणार्या निवडणूकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. अशामध्ये मनसेच्या उमेदवार रूपाली पाटील (Rupali Patil) यांना जीवेमारणीच्या धमकीचा फोन आला आहे. दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार हा फोन सातार्यातून आला होता. तसेच तो रूपाली ऐवजी त्यांच्या सहकार्यांनी घेतला होता. सातारा मधील लबाडे नामक एका व्यक्तीने रूपाली पाटील यांना धमकी चा फोन करून ‘तू जिथे असशील तिथे संपवू टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस,’ असं म्हणत धमकावलं आहे. तर रूपाली पाटील यांनी हा फोन आल्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. (हेही वाचा: महाराष्ट्र विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी सर्व पक्षांतील उमेदवारांची नावे जाहीर, येथे पाहा पूर्ण यादी).
लोकमतशी बोलताना रूपाली पाटील यांनी अशा धमक्यांना घाबरत नाही. या अज्ञात कॉलबद्दल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. येत्या रविवार (22 नोव्हेंबर) पासून पुन्हा सातारा दौर्याला सुरूवात करणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी देखील रूपाली पाटील यांनी केली आहे.
1 डिसेंबरला होणार्या विधान परिषदेच्या या निवडणूकीमध्ये पुण्यात मनसेच्या रूपाली पाटील यांच्याविरूद्ध भाजपचे संग्रामसिंह देशमुख तर महाविकास आघाडीकडून अरुण लाड निवडणूकीच्या रिंगणात आहेत. या निवडणूकीमध्ये यापूर्वी भाजपाचे चंद्रकांत पाटील दोनदा निवडून आले आहेत त्यामुळे आता संग्रामसिंह देशमुख यांना निवडून आणण्यासाठी भाजपा कंबर कसून प्रयत्न करत आहे. मनसेच्या रूपाली पाटील या माजी नगरसेविका आहेत.
औरंगाबाद, पुणे, नागपूर येथे पदवीधर आणि अमरावती, पुणे येथील शिक्षक मतदारसंघासाठी विधानपरिषदेची निवडणूक 1 डिसेंबर रोजी होणार आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
