पुणे कॉंग्रेस भवन तोडफोडीचा आमदार संग्राम थोपटे यांच्या कडून निषेध; कारवाई बाबत दिली 'ही' प्रतिक्रिया
Sangram Anantrao Thopate | Photo Credits: Twitter

पुणे जिल्ह्यातील काँग्रेस आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांना महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जागा मिळू न शकल्याने काल (31 डिसेंबर) त्यांच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. पुण्यातील कॉंग्रेस भवनची त्यांच्या समर्थकांकडून तोडफोड करण्यात आली. त्यानंतर संग्राम थोपटे यांनी हा प्रकार निंदनीय असल्याचं सांगत तोडफोडीचा निषेध केला आहे. दरम्यान या प्रकरणानंतर वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचं सांगत भविष्यात तो स्वीकारला जाईल. निष्ठावंत कॉंग्रेस कार्यकर्ते नाराज नाहीत. त्यामुळे तोडफोड करणारे कार्यकर्ते नेमके कोण होते याचा शोध घेणार असल्याची प्रतिक्रिया थोपटे यांनी दिली आहे. दरम्यान हाय कमांड यावर काय निर्णय घेणार? संग्राम थोपटे यांच्यावर कारवाई होणार काय? हे प्रश्न आता उभे ठाकले आहेत.

संग्राम थोपटे जिंदाबाद... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मुर्दाबाद अशा घोषणा देत काल थोपटे समर्थकांनी पुण्यातील कॉंग्रेस भवनात तोडफोड करण्यास सुरुवात केली. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संग्राम थोपटे यांना काँग्रेसने शब्द दिला परंतू तो शब्द पाळला नाही. निवडणूक काळात काँग्रेस नेतृत्वाने जनतेला आवाहन करत थोपटे साहेबांना विजयी करा त्यांना मंत्रीपद द्यायचे काम आम्ही करु अशा शब्द काँग्रेस नेतृत्वाने दिला होता. मात्र, हा शब्द पाळला नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला होता. कॉंग्रेस भवनची तोडफोड करणाऱ्या संग्राम थोपटे यांच्या 19 समर्थकांना अटक; मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी.

ANI Tweet  

मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. तिन्ही पक्षांतील नाराज पक्षश्रेष्ठींच्या भेटीला गेले आहेत. येत्या काही दिवसात महाविकास आघाडीचे खाते वाटप जाहीर केले जाणार आहे.