भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद (Mumbai Press Confernce) घेतली. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati shivaj Maharaj) यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेलं आहे. स्वराज्याची शपथ महाराजांनी रायगडावर घेतल्याचं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं. प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्याकडून छत्रपतीं बाबत चुकीच्या वक्तव्यावर राज्यभरातून टिकेची झोड उठली. शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादीसह (NCP) विविध विरोधी पक्षांनी आमदार लाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) नंतर मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) आणि आता प्रसाद लाड यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत सतत होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात राजकारण चांगलचं तापलं आहे.

 

भारतीय जनता पक्षानं (BJP) इतिहास संशोधन मंडळाची नव्यानं स्थापना केलीय का? असा सवाल उपस्थित करत शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तर अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे इतिहासाचे दाखले देण्यास एकतर मनाई करावी किंवा अशा व्यक्तींना इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे,अशी बोचरी टीका करत राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला आहे. (हे ही वाचा:- Chatrapati Sambhaji Maharaj: हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास.. छत्रपती संभाजी महाराजांचा झी स्टुडिओला अल्टीमेटम)

 

छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा आम्ही मनापासून सन्मान करतो. माझ्या वक्तव्यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणतं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जाहीर माफी मागितली आहे.