Alibaug MLA Accident: अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू
Accident (PC - File Photo)

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात झाला आहे. रायगडमधील मुरुड तालुक्यातील उसडी येथे ही घटना घडली. या अपघातात आमदार दळवी सुखरुप असून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या कारची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. जासीम अब्दुल रहेमान पासवारे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. आमदार महेंद्र दळवी आगरदांडा येथे कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात घडला. (Deep Pothole On Samruddhi Highway Bridge: अमरावतीतील लोहेगाव येथील समृद्धी महामार्ग पुलावर पडले खड्डे (Watch Video))

शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला रायगड जिल्ह्यामधील उसडी गावातील टोल नाक्याजवळील तळारोड जवळ अपघात झाला. एका दुचाकीस्वाराने आमदार महेंद्र दळवी यांच्या धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. तर आमदार महेंद्र दळवी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातातील जासीम अब्दुल रहेमान पासवारे यांच्या मृत्यूबाबत आमदार दळवी यांनी दु:ख व्यक्त केलं.

अपघात झाल्यानंतर दुचाकीस्वाराला रुग्णालयात हलविण्यात आलं. तर महेंद्र दळवी यांनाही रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी या अपघात प्रकरणी प्राथमिक चौकशी सुरु केली आहे. अद्याप कोणताही गुन्हा या प्रकरणी नोंदवला नाही आहे.