कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्रात उद्यापासून (8 ऑक्टोबर) मिशन कवच कुंडल योजना (Mission Kavach Kundal Yojana) राबवली जाणार आहे. ही योजना 14 तारखेपर्यंत म्हणजेच 6 दिवसांसाठी असणार आहे. ज्यात 15 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे राज्य सरकारचे (Maharashtra Government) लक्ष्य आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली आहे. तसेच केंद्राकडून राज्याला पुरेसा लशींचा साठा मिळाला असून लवकरात लवकर राज्यातील प्रत्येक नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
नुकतीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. त्यावेळी त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारकडून राज्यात 8 तारखेपासून मिशन कवच कुंडल योजना राबवली जाणार आहे. ही योजना 14 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच 6 दिवस चालवली जाणार आहे. या योजनेंतर्गरात राज्यात 15 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांसह आणि संबंधित भागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांना लवकरात लवकर लशींच्या दोन्ही मात्रा देण्याकडे राज्य सरकार लक्ष्य देत आहे, असेही राजेश टोपे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Maharashtra Temples Reopen: महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे आजपासून उघडली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचे पालन करून दर्शन घेण्याचे केले आवाहन
व्हिडिओ-
महाराष्ट्रात बुधवारी 4 लाख 49 हजार 64 जणांना लस देण्यात आली आहे. तर, राज्यात एकूण 8 कोटी 46 लाख 48 हजार 653 जणांना लस देण्यात आली आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी काल ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.