Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

मीरा भाईंदरचे (Mira-Bhayandar) शिवसेना नगरसेवक हरिश्चंद्र आंमगावकर (Harishchandra Amgaonkar) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी ही दु:खद बातमी शेअर केली आहे. दरम्यान सोशल मीडीयामध्ये हे वृत्त शेअर करताना त्यांनी हरिशचंद्र आमगावकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान आठवड्यापूर्वी त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली होती. ठाण्यामध्ये वेदांत हॉस्पिटलमध्ये (Vedant Hospital) त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यासोबतच त्यांच्या घरातील काही व्यक्तींनाही कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबईत कोरोना व्हायरसचा कहर! दिवसभरात 64 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू; तर 1314 जणांना कोरोनाची लागण

हरिश्चंद्र आंमगावकर हे मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये दोन टर्म नगरसेवक होते. यापूर्वी त्यांनी मीरा भाईंदर महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष पद देखील भूषवले होते. सध्या ते महानगरपालिका शिवसेनेचे गटनेते म्हणून काम करत होते. तर हरिश्चंद्र हे आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते.

आमदार प्रताप सरनाईक यांची श्रद्धांजली

 

View this post on Instagram

 

भाईंदरचे शिवसेना नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांच्या निधनाची बातमी खूपच धक्का देणारी, मनाला अस्वस्थ करणारी आहे. गेले काही दिवस ते कोविड वर उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून सर्व ते प्रयत्न केले. गेले अनेक वर्षे ते शिवसेनेत सक्रिय होते. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून कोरोना च्या काळातही भाईंदर मध्ये दिवस रात्र जनतेच्या सेवेला त्यांनी वाहून घेतले होते. सेवा करत असताना त्यांना कोरोनाने गाठले. सतत हसतमुख आणि लोकांमध्ये मिसळणारा, लोकांच्या एका हाकेला तात्काळ धावून जाणारा, पक्षावर अढळ निष्ठा असलेला व सर्वांना सोबत घेऊन चालणारा असा हा हाडाचा सेवाभावी कार्यकर्ता आज अचानक आपल्यातून गेल्याने मीरा भाईंदर शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे. तमाम शिवसैनिक व मीरा भाईंदरच्या जनतेकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

A post shared by Pratap Sarnaik (@pratap_sarnaik) on

दरम्यान हरिश्चंद्र आंमगावकर यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांना काही दिवसांपूर्वी डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर भाऊ आणि आई यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 88 हजार 528 वर पोहचली आहे. यापैकी 3 हजार 169 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 40 हजार 975 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.