
Ishwar Marwadi Murder Case: मुंबईतील चेबुंर (Chembur) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 17 वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या केल्या प्रकरणी मुंबई शहर हादरलं आहे. ईश्वर मारवाडी असं हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून आरोपीने मुलाची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीने मुलाचा खून केला असून त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केले आहे. या घटनेमुळे मुंबई शहरात खळबळ उडाली आहे.
आरोपीने पोलिसांनी पकडताच गुन्हा कबुल केला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेंबुर परिसरातील म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या शफीक शेख याने मुलाची हत्या केली. शफीकला आपल्या पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय आला. 17 वर्षाच्या मुलासोबत तीचं संबंध असल्याचा त्याला संशय आला. शफीक याने वेळेचा फायदा घेत, त्याचा खून केला. आरोपीने मृतदेहाचे चार तुकडे केले. त्याचे डोके, दोन हात कापण्यात आले आहे. आरोपीने मृतदेहांचे तुकडे एका कपड्यामध्ये बांधून ठेवलं.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तपासणी सुरु केली. शफीक याच्या घराची तपसाणी करताना, ईश्वरच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. पोलिसांनी हत्येच्या गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे कबुली केली. शफिकने कोयत्याने ईश्वरच्या मृतदेहाचे तुकडे केले. तुकडे पिशवीत बांधून घरात लपवले होते. सोमवरी शफीकने ईश्वरला घरात बोलवले होते त्यांच्या भांडण झालं. आणि शफिकने हे कृत्य केलं. ईश्वरच्या मित्राने पोलिसांत धाव घेत शफिकने ईश्वरचे अपहरण केल्याचे सांगितले. तेव्हा ही गोष्ट उघडकीस आली.