Gunaratna Sadavarte: सदावर्ते दाम्पत्यावर सहकार खात्याची मोठी कारवाई; एसटी बँकेच्या संचालकपदावरून हकालपट्टी

गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्याने मोठा दणका दिला आहे. या दोघांचीही एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय, संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशिर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्यात आले आहे. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांनी केली होती सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली होती. (हेही वाचा - Bombay High Court Upholds Renaming Of Aurangabad, Osmanabad: औरंगाबाद आणि उस्मानाबाद च्या नामांतरावर मुंबई उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब)

त्यामुळे सदावर्ते दाम्पत्य यापुढे एसटी बँकेवर तज्ज्ञ संचालक म्हणून कामकाज करू शकणार नाही. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या तक्रारीनुसार, 4 ऑक्टोबर 2023 मध्ये सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळ येथे बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचे वाटप करण्यात आले नव्हते. त्यावर नथुराम गोडसे यांचे फोटो प्रिंट करण्यात आले होते. तसे पाहता, एसटी बँक, एसटी कर्मचारी यांचा या राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यापूर्वी सर्व सभासदांना 14 दिवसआधी सभेची सूचना देणे आवश्यक होते.

एसटी बँकेच्या प्रकरणात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. एसटी बाहेरच्या लोकांना बँकेच्या सदस्यत्व देण्याचा ठरावही नामंजूर करण्यात आला आहे. या आणि अशा प्रकारच्या एकूण 13 बेकायदेशीर विषयांची तक्रार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांनी सहकार खात्याकडे केली होती.यातील बहूसंख्य विषयांना स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे सहकार खात्याने सदावर्ते दांपत्याला चांगलीच कायद्याची चपराक दिलेली आहे. यापुढे सदावर्ते यांचा कुठलाही संबंध आता एसटी बँकेशी राहणार नाही.